रसफरटाइड (PTG-300) उत्पादन प्रशिक्षण व्हिडिओ

PTG-300 इंजेक्ट करण्यापूर्वी तुम्हाला माहीत असावी अशी महत्त्वाची माहिती

  • PTG-300 तयार करायला सुरुवात करण्यापूर्वी आणि ते इंजेक्ट करण्यापूर्वी खाली दिलेल्या वापरासंबंधित सर्व सूचना वाचा.
  • केवळ औषधाच्या किटमध्ये दिलेल्या वस्तू वापरा.
  • किट कालबाह्य झाला असेल किंवा त्यातील कोणत्याही वस्तू उघडलेल्या, खराब झालेल्या किंवा गहाळ असतील तर तो वापरू नका. क्लिनिकल साइटशी संपर्क साधा.
  • तुम्ही तयार करायला सुरुवात करण्यापूर्वी फ्रीजमधून किट किमान 15 मिनिटे काढून खोलीच्या तापमानाला स्वतःहून येऊ द्या.
  • दरवेळी तुम्ही इंजेक्ट कराल, तेव्हा तुमच्या औषध किटबरोबर तुम्हाला एक शार्प्स कंटेनर (क्लिनिकल साइटद्वारे प्रदान केलेला) आवश्यक असेल.
  • वायल्सच्या वर असलेल्या राखाडी रबर स्टॉपरला स्पर्श करू नका.
  • सिरिंजचे टोक किंवा सुईचा तुमचे हात अथवा इतर कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श होऊ देऊ नका.
  • औषध मिसळल्यानंतर 4 तासांच्या आत इंजेक्ट करा.
  • फक्त सबक्यूटेनिअस इंजेक्शनसाठी (त्वचेखालील मेदाच्या स्तरामध्ये थेट इंजेक्ट करा).
  • सुरक्षित हाताळणीसह किटमधील वस्तूंची योग्य विल्हेवाट कशी लावावी किंवा त्या परत कशा कराव्यात यासाठी रसफरटाइड (PTG-300) ची विल्हेवाट लावणे हा विभाग पहा. सर्व वस्तू फक्त एकदा वापरण्यासाठी आहेत.
  • न वापरलेल्या औषधांच्या वायल्स क्लिनिकल साइटला परत करा.
सुरू करण्यासाठी येथे क्लिक करा